*नि-क्षय..*
"Yes, We Can End TB."
24 मार्च- जागतिक क्षयरोग दिन म्हणून सबंध जगामध्ये क्षयरोगाचे गांभीर्य, उपचार पद्धती व त्याबाबत समाजामध्ये विषयाची जागृती अनुषंगाने साजरा केला जातो.
क्षयरोग हे जगापुढे आजारातील सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. दरवर्षी या आजारामुळे लाखो लोकांचे जीव जातात आणि ही आकडेवारी दर वर्षाचा विचार केला तर कोविड आजाराने मृत पावलेल्या रुग्णांपेक्षा दरवर्षी क्षयरोगाने मृत पावणाऱ्यांची संख्या जास्त आहे, इतके या आजाराचे गांभीर्य आहे.
म्हणून याबाबत नागरिकांना क्षय रोगाची लक्षणे, तपासण्यांचे प्रकार, उपचार पद्धती व अनुषंगिक शासनाचे अर्थसहाय्य विषयी जनजागृतीसाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना या सबंध बाबींविषयी माहिती व्हावी करिता दिनांक 20 मार्च पासून *क्षयरोग जनजागृती सप्ताह* साजरा केला जातो आणि त्यामध्ये विविध प्रचार प्रसार माध्यमातून जनजागृती करण्याचा उपक्रम शासनाद्वारे राबविला जातो.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत *निक्षय पोषण आहार* योजने अंतर्गत *निक्षय मित्र* बनून क्षय रुग्णांना ज्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे त्यांना दत्तक घेऊन न्यूट्रिशनल सपोर्ट म्हणून दर महिन्याला 500/- रू. ची पोषण आहार किट देऊन या क्षयरुग्णांना औषधोपचारासह पूरक पोषण आहाराची मदत केल्या जाते आणि यांची नोंद भारत सरकारच्या पोर्टलला *निक्षय मित्र* म्हणून नोंदविल्या जाते.
हे औचित्य साधून आपल्या समाजातील गरीब व गरजू क्षय रुग्णांना त्याचे औषध उपचार काळात पोषण आहाराकरिता मदत करण्यास आपण *निक्षय मित्र* म्हणून समोर यावे व शासकीय रुग्णालय वा आरोग्य संस्था यांना संपर्क करून *जगातील या मोठ्या आव्हानाला समोरी जाण्याकरिता आपला वाटा उचलावा..🙏*
*डॉ. प्रवीण पडवे,*
तालुका आरोग्य अधिकारी,
ता. हिंगणा, जि.नागपुर.
📱9923786010



No comments:
Post a Comment