• जीवनकौशल्या प्रशिक्षण, समुपदेशन, योग्य उपचार.
• सुरक्षित पाठपुरावा व स्वच्छता यांसाठी प्रवृत्त करणे.
• त्या भागात कायमस्वरुपी आढळणारे आजार. उदा.हिवताप, काला आजार, जपानी, मेंदूदाह इत्यांदीचे प्रतिबंधन व नियंत्रण.
रोगसर्वेक्षण आणि साथीच्या आजारांवर नियंत्रण
• अस्वाभाविक आरोग्य घटनांबाबत जागरुकता व योग्य उपाययोजना
• पाणी साठयांचे निर्जंतुकीकरण
• पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी राष्ट्रीय साथरोग नियंत्रण संस्थेने तयार केलेल्या एच टु एस फिल्ड टेस्टच्या सहाय्याने करावी.
• सेप्टीक संडासचा वापर, कचर्याची योग्य विल्हेवाट यांसह स्वच्छतेसाठी प्रवृत्त करणे.
• जीवनविषयक आकडेवारीची संकलन व अहवाल सादरीकरण.
• आरोग्य/शिक्षण वर्तणुकीतील बदलासाठी संदेशवहन.
• राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमासह इतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविणे.
• नेहमीच्या व तात्काळ उपचार सुविधा सेवा
• जे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात त्यांना व जे रुग्ण उपकेंद्रावरुन अथवा अन्य ठिकाणांहून संदर्भसेवा दिल्याने येतात त्यांना या सेवा उपलब्ध व्हाव्यात.
या सेवात खालील गोष्टींचा समावेश होतो.
• उपचार देणे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करणे शक्य नसलेल्या रुग्णांना संदर्भसेवा.
• रुग्णालयात दाखल करावयाची गरज आहे अशांना आंतररुग्ण उपचार देणे.
सद्यस्थितीत विविध दर्शकांचे जिल्हयातील दर खालीलप्रमाणे आहेत.
गरोदर मातेला मिळणार्या प्रसुतीपूर्व सेवा :- ९८ टक्के
प्रशिक्षित व्यक्तीने केलेली बाळंतपणे :- ९९.०० टक्के
स्त्री- पूरुष प्रमाण (० ते ६ वर्षे) :- ९५१ (जनगणना २०११ )
संरक्षित जोडपी प्रमाण :- ७४ टक्के
No comments:
Post a Comment