100 दिवस कार्यक्रम - विभागातून दुसरे मानांकन..

तालुका आरोग्य अधिकारी हिंगणा कार्यालयाला नागपूर विभागातून दुसरे मानांकन..

मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पुरस्कृत- 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम कार्यक्रमांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंगणा, जि. नागपूर चा विभागीय स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणारे महाराष्ट्रातील तालुकास्तरीय शासकीय कार्यालये- दुसरा टप्पा अंतर्गत नागपूर विभागातून दुसरा क्रमांक मिळाला.

तालुका आरोग्य अधिकारी हिंगणा डॉ. प्रवीण शकुंतला डोमाजी पडवे यांचे मनोगतान्वये_

“निश्चितच एका कार्यासन आस्थापने करिता ही अभिमानाची बाब आहे. मला माझ्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यकक्षे अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे.

This is all about Team Efforts.

एक सबंध कार्यालय किंवा एक संस्था पुरस्कृत होणं म्हणजे नेमक्या व्यक्तीचे काम नसून संपूर्ण टीमच्या कार्याची प्रचिती आणि पावती असते.

निश्चितच त्यात काहींचा जास्त पुढाकार असतो त्याप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंगणा च्या 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत कार्यालयाचा ब्लॉग तयार करणे, पीपीटी तयार करणे, इत्यंभूत माहिती सादर करणे, कार्यालयाची ठेवण योग्य राखणे, नस्त्या व अभिलेखे वर्गीकृत करणे, जतन करणे व निष्काशीत करणे, जनोपयोगी किमान बाबी दर्शनीय करणे इत्यादी बाबींवर प्रामुख्याने भर देण्य

यावर कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी हिरहिरीने सहभाग घेऊन वैयक्तिक भूमिका बजावली.

कार्यालयीन आस्थापनेतील खालील सर्व कर्मचारी –

श्री. मोहन भोयर (आरोग्य पर्यवेक्षक)

श्री. किशोर वैद्य (आरोग्य सहाय्यक)

श्री. गणेश कंगाले (कुष्ठरोग तंत्रज्ञ)

श्रीमती संगीता सोमकुवर (कनिष्ठ सहाय्यक)

श्री. धम्मदीप गणवीर (वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक)

श्री. चंद्रकांत राऊत (लेखापाल)

श्री प्रशांत कोहाडे (कार्यक्रम सहायक)

श्रीमती प्रीती लांजेवार (तालुका समूह संघटक)

कु. आचल गुजरकर (निम वैद्यकीय कर्मचारी कुष्ठरोग)

श्री. संजू नैताम (लसीकरण क्षेत्रीय निरीक्षक)

श्री. कृष्णा टाक्रस (परिचर)

व श्रीमती रेखा गायकवाड (परिचर) ज्यांनी या मोहिमेच्या काळात कार्यालयाची देखरेख व स्वच्छतेवर विशेषत्वाने काम केले.”

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंगणा च्या आस्थापनेत कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी यांचे पुनश्च एकदा अभिनंदन…

या मोहिमेंतर्गत वेळोवेळी जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री विनायक महामुनी, जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. राजकुमार गहलोत, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. असीम इनामदार व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी मा. डॉ. रेवती साबळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

अशाच प्रकारे सर्वांनी आपल्या कार्यालयाची, आपल्या संस्थेची गरिमा उत्तरोत्तर उंचवावी, आपले निर्देशांक वाढवावीत… & …

” First Feel Proud Ourselves & Let Others Feel Proud Of You. “💫






No comments:

Post a Comment