दि. 21 फेब्रुवारी 2024 ला आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत कुटुंब कल्याण कार्यक्रमात सन 2022-23 कालावधीमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे आरोग्य कर्मचारी अधिकारी यांचा गौरव कार्यक्रम श्री आबासाहेब खेडकर सभागृहात पार पडला.
नागपूर जिल्ह्यात सर्वात जास्त संस्थात्मक प्रसूती करणाऱ्या आरोग्य सेविका या गटाकरिता हिंगणा तालुक्यातील तीन आरोग्य सेविका यांनी अव्वल क्रमांक पटकावित तीनही पुरस्कार हिंगणा तालुक्याला मिळवून दिलेत. यात -
* टाकळघाट प्रा.आ.केंद्रातील आरोग्य सेविका श्रीमती प्राची घुबडे,
* कान्होलीबारा प्रा.आ.केंद्रातील श्रीमती सुषमा नासरे,
* सालईदाभा उपकेंद्रातील श्रीमती अर्चना वासेकर
यांचे समवेत करविते संबंधित संस्थांचे वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना मान्यवर जिल्हा परिषद नागपूर मा. अध्यक्ष श्रीमती मुक्ताताई कोकड्डे, मा. उपाध्यक्ष कु. कुंदाताई राऊत, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती डॉ. रेवती साबळे तसेच उपस्थित गणमान्य यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त कर्ते, करविते वैद्यकीय अधिकारी व चमू या सर्वांचे हार्दिक अभिनंदन..💐💫💐



No comments:
Post a Comment