जीवन विषयक घटनांची नोंद

 जन्म – मत्यू, मातामत्यू , अर्भकमत्यू यांसारख्या जीवनविषयक आकडेवारीची (घटनांची) नोंद घेणे व अहवाल पाठविणे (२१ दिवसांचे आत)

प्राथमिक आरोग्य केंद्र
 
• अ)वैद्यकीय सेवा :-
बाहयरुग्ण सेवा :- ४ तास सकाळी व २ तास संध्याकाळी.
२४ तास तातडीची सेवा :- जखमा व अपघात यांचे योग्य व्यवस्थापन व प्रथमोपचार, संदर्भसेवेपूर्वी रुग्णाला जीविताचे धोक्याबाहेर आणणे, श्वानदंश, विंचूदंश, सर्पदंश व इतर तातडीच्या रुग्णांना योग्य सेवा देणे.
 
• संदर्भसेवा :- ज्या रुग्णाला विशेषज्ञांच्या सेवेची आवश्यकता आहे अशा रुग्णांना योग्य व तत्पर संदर्भसेवा :-
• रुग्णांना पुर्वपदावर आणणे ( Stablization )
• संदर्भसेवेच्या प्रवासा दरम्यान रुग्णांना योग्य त्या अनुषंगिक सेवा देणे.
• प्रा.आ.केंद्राच्या वाहनातून अथवा वैद्यकीय अधिका-याजवळ असलेल्या उपलब्ध अनुदानातून, भाडयाच्या वाहनातून संदर्भसेवा देणे.
 
आंतररुग्ण सेवा ( ६ बेड ) 

No comments:

Post a Comment