मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी

 


♦️मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष —

गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी आशेचा किरण..

आजही आपल्या समाजात अशी अनेक कुटुंबं आहेत, ज्यांच्या आयुष्यात आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. आर्थिक दुर्बलतेमुळे उपचार घेता न येणं, दवाखान्यांचे खर्च परवडत नसणं ही दुर्दैवी परिस्थिती अनेक गरजू रुग्णांच्या वाट्याला येते. अशा वेळी "मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष" म्हणजेच आशेचा किरण ठरतो.

काय आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष ?..

ही योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अपंग, दिव्यांग, अपघातग्रस्त किंवा गंभीर आजाराने पीडित असलेल्या रुग्णांना या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. सरकारी तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाचा काही भाग मुख्यमंत्री सहायता निधीतून भरला जातो.

♦️योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये:

✅ गरीब व गरजूंना तातडीने वैद्यकीय मदत.

✅ राज्यभरातील नामांकित रुग्णालयात लागू.

✅ ऑनलाईन अर्जाची सुविधा.

✅ प्रमाणपत्रासह अत्यल्प दस्तऐवजीकरण.

♦️कोण करू शकतो अर्ज ?..

* ज्या रुग्णांची आर्थिक स्थिती दुर्बल आहे,

* ज्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी आहे,

* जे गंभीर आजारांसाठी (उदा. कॅन्सर, हृदयविकार, किडनी विकार, मेंदूच्या शस्त्रक्रिया, अपघात) उपचार घेत आहेत.

* ज्या रुग्णांना तत्काळ मदतीची गरज आहे.

♦️अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

* डॉक्टरांचे उपचार सल्ला पत्रक (खर्च अंदाजपत्रक-Estimate).

* रुग्णाचे आधार कार्ड.

*  उत्पन्न प्रमाणपत्र.

* रहिवासी प्रमाणपत्र.

* हॉस्पिटलचे पत्र.

* रुग्णालयाची मंजुरी व नोंदणी क्रमांक.

♦️अर्ज कसा करावा ?..

https://sjsa.maharashtra.gov.in या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो.

संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात जाऊन देखील अर्ज करता येतो.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाशी संपर्क साधता येतो.

🏵️ मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष एक जीवनदायी संधी आहे. गरजूंना जगण्यासाठी नवी उमेद देणारी ही योजना प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सेवा मिळावी, हा हक्क शासनाच्या माध्यमातून अधिक बळकट होत आहे. त्यामुळे ही योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे तर..

जगण्याचा आधार आहे — आशेचा किरण आहे ...💫

No comments:

Post a Comment