नियोजित गर्भधारणेपूर्वी तीन महिने फॉलिक ऍसिड चे सेवन

 फॉलिक अ‍ॅसिड आणि त्याचा गर्भधारणेशी संबंध :

फोलिक अ‍ॅसिड हे बी कॉम्पलेक्स या जीवनसत्वांपैकी एक महत्वाचे जीवनसत्व आहे.

याची गर्भधारणा होण्यापूर्वी आणि गर्भधारणा झाल्या नंतरही अधिक गरज असते.

या जीवनसत्वाचा अभाव असल्यास जन्मणाऱ्या बाळांध्ये मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासाच्या विकृती होण्याचे प्रमाण अधिक असते. मेंदू व मज्जारज्जू (Brain and Spinal Cord) यांचे विकसन गर्भधारणा झाल्या झाल्या लगेच गर्भधारणेच्या सहा आठवड्यात सुरु होत असते.

हे अवयव तयार होण्यासाठी न्यूरल ट्युब वेळीच व्यवस्थित बंद व्हावी लागते. हे न झाल्यास बाळाचा मेंदू विकसित न होणे, मज्जारज्जूचे किंवा मेंदूचे इतर विकार होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या काही विकारांध्ये बाळ जगू शकत नाही, तर काही विकाराुंळे त्याला जन्मजात अपंगत्व, मूत्र, विष्ठा बाहेर टाकण्याच्या क्रियेवर नियंत्रण नसणे, अशा गंभीर विकृती होऊ शकतात.

अशा विकृती होण्यामागे एक कारण फोलिक अ‍ॅसिडची कमतरता हे असते.

विकृती होण्यापासून गर्भ वाचवण्यासाठी उपाय -

• फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळयांचे गर्भधारणा होण्यापूर्वी ३ महिने आधीपासून सेवन केल्यास या विकृतीचे प्रमाण जवळपास ७० टक्क्यांनी कमी होते.

• गर्भधारणेचे योग्य नियोजन करायला हवे.

• गर्भधारणा हवी असलेल्या महिलेने फॉलिक अ‍ॅसिडची गोळी रोज घ्यायला हवी. या गोळीचे कोणतेही अनिष्ट परिणाम नसतात.

• सर्वसाधारण स्त्रियांना रोज ४०० मायकोग्रॅ इतकी मात्रा पुरेशी असते. ही मात्रा आय.एफ.ए. गोळीतून देखील मिळते.

शिवाय आहारामध्ये भाज्या व फळे यांचा समावेश करावा. असे केल्याने मज्जासंस्थेच्या विकृती टाळण्यास मदत होतेच. शिवाय इतरही विकृतीचे प्रमाण कमी होते. शिवाय मातेस अ‍ॅनिमिया होण्याची शक्यता कमी होते.

विकृती टाळण्यासाठी -

गर्भधारणेचे नियोजन करा.

गर्भधारणेपूर्वी ३ महिने फोलिक अ‍ॅसिडचे सेवन सुरु करा.

गर्भधारणा राहिल्यानंतरही पहिले तीन महिने फोलिक अ‍ॅसिड चालू ठेवा.

यामुळे बालकामध्ये होणाèया मेंदू व मज्जारज्जूच्या विकृतीचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.

काही स्त्रियांच्या बालकांना या विकृती होण्याची शक्यता इतर स्त्रियांपेक्षा अधिक असते. उदा.

• आधीच्या बाळंतपणात अशा विकृती असलेल्या बाळाचा जन्म झालेला असलेल्या स्त्रिया.

• मधुेही किंवा अतिलठ्ठ स्त्रिया.

• फिट्सच्या (आकडी येणे) विकारावरील औषधे घेणाèया स्त्रिया.

• कुटुंबामध्ये अशा विकृत बालकांचा जन्म झालेला असल्यास

अशा स्त्रियांनी तर याबाबतीत अधिक दक्ष रहायला हवे. त्यांनी वैद्यकिय सल्ला घेऊन गर्भधारणेपूर्वी अधिक काळजी घ्यायला हवी. अशा स्त्रियांना फोलिक अ‍ॅसिडची ५ मि.ग्रॅची गोळी गभर्धारणेपूर्वी ३ महिने वैद्यकिय सल्ला घेऊन सुरु करायला हवी.

No comments:

Post a Comment