गर्भधारणेपूर्वी स्त्रीचे पोषण योग्य असायला हवे.
• त्यामुळे तिला रक्तक्षय (अॅनिमिया)) होणे टाळता येते आणि पर्यायाने होणारे धोके टाळता येतात.
• मुदतपूर्व प्रसूती आणि कमी वजनाचे बाळ जन्मण्याचे प्रमाण कमी होते.
• व्यंग असलेली नवजात अर्भके जन्मण्याचे प्रमाण कमी होते.
• गर्भावस्थेध्ये कुपोषित राहिलेल्या अर्भकाच्या पुढील आयुष्यात त्याला होणारे अतिरक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांचे प्रमाण कमी होते.
किशोरवय हे वाढीचे वय असते. या काळात शरीराची झपाटयाने वाढ होत असते. या वयात अधिक पोषणाची आवश्यकता असते. या काळात गर्भधारणेचा ताण शरीरावर पडल्यास पोषक पदार्थांची कमतरता पडून स्त्रीच्या आणि बाळाच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम घडू शकतात. यासाठी गर्भधारणेपूर्वी पुढील गोष्टी कटाक्षाने पाहिल्या जाव्यात.
• स्त्रीचे वय २० किंवा त्याहून अधिक आणि ३५ पेक्षा कमी आहे .
• तिचा बी.एम.आय. १८.५ ते २५ किलो/ मी²या गटात आहे.
• तिचे रक्तातील हिमोग्लोबीन १२ ग्रॅ आहे.
या बाबी साध्य होईपर्यंत गर्भधारणा पुढे ढकलणे इष्ट ठरते. यासाठी गावपातळीवर करावयाचे प्रयत्न व दयावयाच्या आरोग्यसेवा यांची माहिती असणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment