रक्तक्षय काढण्याचे उपाय, निदान व उपचार

 एच.बी. टेस्ट (कल) - तिच्या बोटातील रक्ताच्या थेंबावर एचबी टेस्ट करुन घ्या. एच.बी. १२ ग्रॅम किंवा अधिक असल्यास तिला अ‍ॅनिमिया नाही.

मात्र सदोष आहार आणि मासिक पाळीत होणारा रक्तस्त्राव यामूळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होत असते. यासाठी जननक्षम वयोगटातील महिलांनी आठवडयातून एकदा प्रतिबंधात्मक लोह गोळीचे आणि दर सहा महिन्यानी जंतनाशक गोळीचे सेवन केल्याने अ‍ॅनिमिया टाळणे शक्य होते.

एच.बी. (कल) १२ किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या महिलांना अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी आठवडयातून एकदा एक लोह गोळीचे सेवन करण्यास प्रवृत्त करा. गेल्या सहा महिन्यात जंतनाशक गोळी घेतली नसल्यास तिचे सेवन करावे.

• १२ पेक्षा कमी एचबी स्त्रीला रक्तक्षय असल्याचे दर्शविते.

• ८ ग्रॅम पेक्षा कमी एचबी, तीव्र रक्तक्षय दर्शविते, अशा गरोदर महिलांना आणि त्यांच्या होणाèया बाळाला अधिक धोका असतो.

रक्तक्षयाची तीव्रता

एच.बी. ११.० ते ११.९ ग्रॅम- सौम्य रक्तक्षय

एच.बी. ८.० ते १०.९ ग्रॅम - मध्यम रक्तक्षय

एच.बी. ८ पेक्षा कमी - तीव्र रक्तक्षय

चौथ्या राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार आपल्याकडे जननक्षम वयोगटातील जवळ जवळ ४८ स्त्रियांना रक्तक्षय असल्याचे आढळलेले आहे.

रक्तक्षयाचे परिणाम :

• थकवा, चक्कर येणे, काम करण्याची शक्ती कमी होते.

• स्मरणशक्ती कमी होते. त्यामुळे शिक्षणामध्ये कमी यश

• रोगजंतूशी मुकाबला करण्याची शक्ती कमी. त्यामुळे वरचेवर जंतूसंसर्ग आणि आजारपण

• रक्तक्षय असताना गर्भधारणा झाल्यास मातेच्या आणि बाळाच्या आरोग्यास हानी.

रक्तक्षयाची कारणे :

• सदोष आहार : आहारामध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्वे B12, folic acid यांची कमतरता. या अन्न घटकांची रक्तातील हिमोग्लोबीन तयार होण्यासाठी आवश्यकता असते.

• जंत, कृमी

• रक्तस्त्राव - मासिक पाळीमध्ये किंवा अन्य प्रकारे

• हिवताप

• सदोष हिमोग्लोबीन - सिकल सेल अ‍ॅनिमिया

गर्भारपणात आणि बाळंतपणात रक्तक्षयाचे अनिष्ट परिणाम :

घ्यावयाची काळजी :

• पुरेसा व समतोल आहार सुरु करावा. आहारात प्रथिने, दूध - दही, पाले भाज्या, फळ भाज्या, फळे यांचा समावेश करावा.

• आहारात आयोडिनयुक्त मिठाचा वापर करावा –

गर्भधारणेस योग्य काळ

इचख १८.५ पेक्षा जास्त, २५ पेक्षा कमी कल १२ ग्रॅम

हे साध्य होईपर्यंत गर्भधारणा टाळावी. यासाठी परिचारिकेकडून कुटुंबनियोजनाच्या साधनांची माहिती घ्यावी. आपल्याला योग्य वाटेल अशा पध्दतीची आपणच निवड करावी असा सल्ला द्या व समुपदेशन करा. लोह गोळयांचे सेवन करावे.

अ‍ॅनिमियाचे निदान व उपचार :

गर्भधारणेपूर्वी अ‍ॅनिमिया बरा करुन घेता येतो आणि सर्व धोके टाळता येतात.

सौम्य किंवा मध्यम अ‍ॅनिमिया - एच.बी.१२ ग्रॅम पेक्षा कमी असलेल्या स्त्रियांनी रोज एक लोहयुक्त गोळी घ्यावी. दर महिन्याला ए.एन.एम.ची भेट घ्यावी. आरोग्य केंद्रामधून दिल्या जाणाèया लोहगोळीमध्ये ६० मि. ग्रॅम एलिमेन्टल आयर्न आणि ०.५ मि. ग्रॅम फॉलिक अ‍ॅसिड असते.

पुरेसा व समतोल आहार सुरु करावा. आहारात प्रथिने, दूध - दही, पाले भाज्या, फळ भाज्या, फळे यांचा समावेश करावा.

लोहयुक्त (IFA) गोळयांच्या सेवनासंबंधी महत्वाच्या सूचना :

• लोहयुक्त गोळी जेवणानंतर दोन तासांनी घ्यावी.

• लोहगोळी घेतल्यानंतर लगेच चहा, कॉफी घेऊ नये.

• क जीवनसत्वयुक्त पदार्थ - फळांचा रस, qलबू सरबत इ. घेणे फायद्याचे असते.

• पोटात अस्वस्थ वाटणे, बध्दकोष्ठता असे परिणाम दिसले तरी गोळया बंद करु नयेत. खूपच त्रास होत असल्यास परिचारिकेस सांगावे.

• तीन महिन्यानंतर पुन्हा एच.बी. टेस्ट करुन ते वाढले आहे का ते पहावे.

गोळया घेऊनही एचबीमध्ये अपेक्षित वाढ होत नसल्यास वैद्यकीय अधिकाèयास दाखवून पुढील तपासण्या व उपचार करुन घ्यावेत. आशाने दर महिन्याला भेट देऊन गोळयांचे सेवन नियमित होते आहे की नाही ते पहावे. शिल्लक उरलेल्या गोळयांचा आढावा घ्यावा.

तीव्र अ‍ॅनिमिया - एच.बी. ८ ग्रॅम पेक्षा कमी असल्यास अशा स्त्रीला त्वरित प्रथमस्तर संदर्भसेवा रुग्णालय/ जिल्हा रुग्णालयात संदर्भीत करावे. तेथील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानी सांगितलेल्या सर्व तपासण्या व औषधोपचार करुन घ्यावेत. वेळोवेळी एच.बी.तपासून ते वाढत असल्याची खातरजमा करावी.

एच.बी.वाढेपर्यंत गर्भधारणा होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी. यासाठी कुटुंबनियोजनाच्या पध्दतीचा वापर करावा.

No comments:

Post a Comment