Wednesday, April 9, 2025

April 2020 जगात कोरोना विषाणु साथिचे थैमान

 *🔖 गरजेच्या हाकेला.. साद ..*

➖➖➖➖🚑➖➖➖➖



       जगात कोरोना विषाणु साथिचे थैमान घातले नि मनुष्याला त्याच्या विसरपडलेल्या/कालभुत झालेल्या सवयींना जाग्रुत करण्याची मुबा मिळाली. 

परिवारा सोबत वेळ घालविणे, छंद जोपासणे, लवकर झोपणे-लवकर ऊठणे, दुरावलेल्या संबंधांना ऊजाळा मिळणे, विसर पडलेल्या नातलगांना आठवणे (फोन करणे), ऊपलब्धतेत/अल्प आवश्यकतेत गुजारा करणे, *अनावश्यकता जि जिवनशैलीचा थोता भाग बनुन बसली त्याविना सहज जगणे* असे जिवनमान आचरणाला भाग पाडले.

यातच अनेकांनी सामाजिक गरजेचे भान ठेवुन अन्नदान, वस्तुदान प्रसंगी श्रमदान करायला सुरुवात केली.

अशाच एका चमुकडुन *ओशिष (सोनु) भगत, अनिलभाऊ चानपुरकर, विनायक ईंगळे (गुरुजी), रामभाऊ गजभिये, जितु मैस्के, पवन महाकुलकर, आदेश व निखिल वानखेडे, राहुल खाडे* यांनी 

आज दि. 07/04/2020 ला 

*तालुका नियंत्रण पथक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंगणा* यांना सँनिटायझर, हँड ग्लोव्हज् व मास्क भेट देण्यात आले. 

संसाधनांची ऊपलब्धता लक्षात घेता 

*जागतिक आरोग्य दिनी* प्राप्त भेटीचा वापर तालुका शिघ्र प्रतिसाद पथकाच्या माध्यमातुन जनतेला व  आरोग्य कर्मिंच्या सुरक्षिततेकरीता करण्यात फार मदतिचे ठरेल.

या साथिचं जाळ कुठवर पसरणार व कधिपर्यंत आपण यावर मात करु हे एक कोडंच म्हणावं,

पण या काळात किमान अशी मदतगार लोकं  गरजुंची गरज व ऊपाश्यांची भुक शमविण्यासाठी पुढ यावित व या जिकरीच्या काळात कोणीही मदती अभावी वा ऊपाशी पोटी मरु नये, 

करीता सामाजिक समुदायाने व प्रत्येकाने  आपली गल्ली व मोहल्ला जरी सुरक्षित केला तरी *आपण हा लढा जिंकलो समजा...* 

सर्व मदतगार चमुला *साभार शुभेच्छां* सह..🙏


*👉 Pls Stay at Home.*

*👉 अनावश्यक घराबाहेर पडु नका.*

*👉 शासकिय निर्बंध व अमलबजावणी पाळा.*


🔖 डॉ. प्रविण पडवे,

तालुका आरोग्य अधिकारी, हिंगणा.

No comments:

Post a Comment