Wednesday, April 9, 2025

जागतिक आरोग्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

 


              जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, हिंगणा व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणा येथील पंचायत समितीच्या बचत भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून हिंगणा येथे हे उपक्रम राबविण्यात आला. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची उपलब्धता वाढवून गरजू रुग्णांना मोफत रक्त पुरविणे, हाच या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

या उपक्रमात ग्रामपंचायत रायपूरचे सरपंच श्री. उमेश आंबटकर यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचे कौतुक केले. शिबिरात अनेक नागरिक, आरोग्य सेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. यामध्ये डॉ. प्रवीण पडवे, डॉ. हिमांशू पिपरीकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे यांनी सांगितले की, “शासकीय रक्तपेढ्यांच्या माध्यमातून अशा उपक्रमांचे नियमित आयोजन केल्यास रुग्णांचे प्राण वाचविण्यात मोठी मदत होईल. रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे.”

No comments:

Post a Comment