नागरिकांना आवाहन
हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, हत्तीरोग हे आजार टाळण्यासाठी जनतेस आवाहन
हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, जे. ई. चंडीपुरा रोगांचा प्रसार लेडीज व एनफिलिस जातीच्या मादीमार्फत होतो. एडिस व एनफिलिस डासाची उत्पत्ती स्वच्छ साठलेल्या पाण्याच्या साठ्यांमध्ये उदा. नाले, नदी, पाण्याच्या खुल्या टाक्या, भात शेती इत्यादी ठिकाणी होते. हत्ती रोगाचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीपासून होतो. त्या डासाची उत्पत्ती सांडपाण्यात होते.
लक्षणे
1) अचानक तीव्र ताप येणे.
2) तीव्र डोके दुखी, डोळ्यांच्या खोबणीमध्ये दुखणे.
3) सांधेदुखी व अंगदुखी
4) अंगावर लालसर पुरळ येणे.
5) यामध्ये रक्तातील प्लेटरेट कमी होणे.
6) कधीकधी झटका येऊन रुग्ण बेशुद्ध होतो.
प्रसार
1) हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया प्रसार वरील लक्षणे असणाऱ्या दूषित रुग्णास एडिस व एनफिलिस डासांची मादी चावून जंतुनी बाधित होतो.
2) हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया जंतुनी बाधित डास चावल्यानंतर कोणालाही लागू होऊ शकते.
3) सर्व वयोगटातील व्यक्तींना हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांची बाधा होऊ शकते.
हिवताप, डेंग्यू, चिकनगुनियाचा प्रसार कसा थांबवता येईल.
1) हिवताप, डेंग्यू, चिकनगुनियाचा मच्छर स्वच्छ पाण्यात असतो, कुठे तुमच्या घरच्या आजुबाजूला पाणी तर साचलेले नाही ना! जसे पाण्याची टाकी, पक्षांचे पाणी पिण्याचे भांडे, फ्रिजचे ट्रे, फुलदाणी, नारळाच्या करवंट्या व पाणी साचलेले टायर.
2) पाण्याने भरलेली भांडी आणि टाकी झाकून ठेवा.
3) हिवतापाचा मच्छर हा रात्री चावतो व डेंग्यूचा मच्छर हा दिवसा सांगतो, त्यामुळे असे कपडे वापरा की, त्यामुळे संपूर्ण शरीर झाकले जाईल.
4) रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
खालील ठिकाणी संपर्क करा
1) कोणताही ताप आल्यास रुग्णांनी जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येथे रक्त नमुना त्वरित तपासावा व औषधोपचार घ्यावा.
2) खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया संशयित रुग्णांची तात्काळ माहिती जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रांना कळवावे...

No comments:
Post a Comment